esakal | शिवसेनेची ताकद कमी होतेय; देवेंद्र फडणवीस यांचा टोला | Devendra Fadnavis
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

शिवसेनेची ताकद कमी होतेय; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : राज्यात जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये (jilha parishad election) भारतीय जनता पक्षाला (BJP) सर्वाधिक जागा मिळाली असून सत्ताधारी शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. त्यामुळे राज्यात सेनेची (shivsena) ताकद कमी झाली आहे, हे या निकालांवरून (election results) स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तन येथे व्यक्त केले.

हेही वाचा: मुंबईतील रुग्णवाढीवर लक्ष; चार वेळा रुग्णसंख्या पाचशेच्या वर

उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या पं. दीनदयाळ दर्शन प्रकल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी भय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले. या निवडणुकीत मतदारांनी भाजपवर सर्वांत जास्त विश्वास दाखवल्यामुळे भाजपने एकूण जागांच्या २५ टक्के जागा जिंकल्या आहेत.

२५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत; तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे उरलेल्या ५० टक्क्यांमध्ये राहिले आहेत. यावरून भाजपने राज्यात स्वत:ची व्याप्ती वाढवली आहे आणि ती वाढवतच जाणार आहे; तर शिवसेनेची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी कमी करत आहे आणि याचा विचार त्यांनी करायचा आहे, असे फडणवीस म्हणाले.

लखीमपूर घटनेवर राजकारण

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेबद्दल राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत खेद व्यक्त केला. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, की लखीमपूर घटनेवर खेद व्यक्त करत असतानाच राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे अधिक लक्ष दिले असते. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे जो शेतकरी आक्रोश करत आहे, त्याचा विचार केला असता तर हे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी आहे असे म्हणता आले असते, परंतु त्यासंदर्भात कोणताही ठोस विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव संमत करणे म्हणजे केवळ संधीसाधूपणा आहे आणि यात राजकीय वास येतो. शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी मदत मिळाली नाही तर भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल, असा इशारा फडणवीस यांनी या वेळी दिला.

loading image
go to top