cm devendra fadnavis oath
cm devendra fadnavis oathesakal

CM Devendra Fadnavis 3.0: "बदले बदले सें वो नजर आते हैं", फडणवीस यांची तिसरी टर्म वेगळी ठरण्याचे संकेत

cm devendra fadnavis oath: राजकीय पक्ष फोडण्याचे तसेच विरोधकांना टार्गेट करण्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार विरोधकांनी लावला आहे. विरोधक त्यांना महाराष्ट्रातील राजकीय संवाद संपवण्याला कारणीभूत मानतात.
Published on

राज्यात सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीने मला खूप त्रास दिला; याची आठवण प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार करून दिली होती. मात्र राज्याचे २१वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आता बदल्याचे नव्हे तर बदलाचे राजकारण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी माझे राजकारण पूर्णपणे वेगळे असणार आहे, असे सांगत मुख्यमंत्रिपदाची तिसरी टर्म ही वेगळी असणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.

cm devendra fadnavis oath
New CM Devendra Fadnavis : ‘नदीजोड’, हरित ऊर्जेला प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला पाच वर्षांचा आराखडा

राजकीय पक्ष फोडण्याचे तसेच विरोधकांना टार्गेट करण्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार विरोधकांनी लावला आहे. विरोधक त्यांना महाराष्ट्रातील राजकीय संवाद संपवण्याला कारणीभूत मानतात. मात्र अनेक वेळा दिल्ली हायकमांडने घेतलेल्या निर्णयातही टीकेचा धनी फडणवीस यांना व्हावे लागले. मात्र यावेळी ही प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकण्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. त्याचीच झलक फडणवीस यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळाली.

cm devendra fadnavis oath
Devendra Fadnavis: महायुती सरकार २.० ला सुरूवात! पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या शिलेदारानं घेरलं, थेट मुख्यमंत्र्यांवर आधी आरोप नंतर आवाहन

याबाबत राजकीय विश्लेषक डॉ. सुमित म्हसकर यांनी सांगितले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत आक्रमक राजकारण केले. या काळात विरोधकांना त्यांनी शिंगावर घेतले, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर झाला हेदेखील नाकारता येणार नाही. मात्र फडणवीसांचे आक्रमक राजकारण त्यांच्याविरुद्ध गेले व त्यांची प्रतिमा मलिन झाली. यात त्यांच्या जातीचा एक फॅक्टर होता. फडणवीस यांच्या हे लक्षात आले आहे. त्यामुळे यावेळी विरोधकांना एकही संधी ते देणार नाहीत. त्यांच्यात काही बदल निश्चितच बघायला मिळतील.’

विधिमंडळाच्या परंपरेनुसार शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी अलीकडच्या काळात राज्यात दूषित झालेली राजकीय संस्कृती जाग्यावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे; मात्र राज्यातील बदलेले राजकीय वातावरण, संस्कृतीवर पुनर्विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना मी स्वत: फोन करून शपथविधी समारंभाला येण्याचे निमंत्रण दिले. काही कारणास्तव हे नेते येऊ शकले नाही; मात्र त्यांनी आवर्जून मला शुभेच्छा दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

cm devendra fadnavis oath
New CM Devendra Fadnavis : ‘नदीजोड’, हरित ऊर्जेला प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला पाच वर्षांचा आराखडा

दक्षिण भारतातील राज्यात जसे टोकाच्या राजकारणाची एक संस्कृती आहे. तसे महाराष्ट्रात नाही, राज्यात राजकीय संवाद कधी संपला नाही हे सांगत, यावेळी संवादाची प्रक्रिया जपणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.

‘लाडक्या बहिणीं’चे समर्थन

आर्थिक विषयावर अत्यंत काटेकोर बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना तसेच इतर सामाजिक योजनांचे समर्थन केले. सामाजिक योजना या दीर्घकाळासाठी राज्याच्या हिताच्या असतात हे समजवून सांगत, यावेळी निकष, अभ्यास करू हे शब्द टाळले. उलट लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र लाभार्थी आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना काही त्रुटी असतील त्याचा विचार करू, मात्र लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुनर्विचार करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

cm devendra fadnavis oath
Devendra Fadnavis: महाराष्ट्र कायमचा दुष्काळ मुक्त होणार! CM फडणवीसांचा मोठी घोषणा; 'या' प्रकल्पांना दिली मान्यता

केवळ हिंदुत्वावर जनमत सांभाळून ठेवता येणार नाही. काही महिन्यांत मुंबई पालिकेसह राज्यातील पालिका निवडणुका होतील. लाडकी बहीण योजनेत थोडे बदल करण्याचा प्रयत्‍न झाला तरी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यावेळी सामाजिक योजना तशाच सुरू राहतील, असे संकेत आहेत.

- डॉ. सुमित म्हसकर, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com