बाळासाहेबांचा रिमोट आवडला असता : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

मुंबई : युती होती म्हणूनच इथपर्यंत पोहचलो. युतीत अनेक अडचणी आल्या, पण त्या दूरही झाल्या. आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "रिमोट कंट्रोल' असता तर नक्कीच आवडला असता, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काल राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यासाठी आगामी "ठाकरे' या चित्रपटाचा खेळ ठेवण्यात आला होता. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता सलमान खान, संजय दत्त यांच्यासह अनेक दिग्गज नेते व अभिनेते उपस्थित होते. या वेळी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि पवार यांची संक्षिप्त मुलाखत घेतली. 

मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप युतीचे महत्त्व विशद केले. दोन्ही पक्षांची युती होती म्हणूनच आजची सत्ता आहे. युतीमुळेच मी मुख्यमंत्री आहे. या युतीमध्ये अनेकदा काही अप्रिय प्रसंग आले, पण बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मनाने त्या वेळच्या अडचणी दूर केल्या. वडीलकीच्या नात्याने त्यांनी प्रत्येक प्रसंगातून तोडगा काढला. या वेळीही तोडगा निघेल. युती नक्कीच होईल. काळजीचे कारण नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Web Title: Devendra Fadnavis speaks about Balasaheb Thackeray while screening of Thackeray movie