
मुंबई : मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो... हे वाक्य कानी पडताच आझाद मैदानावर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला. जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकल्यानंतर आज आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.