
मुंबई : मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी लवकरच पार्किंग धोरण आणण्यात येणार आहे. त्यात मुंबईकरांना नवे वाहन खरेदी करताना पार्किंग असणे आवश्यक आहे; परंतु त्यासोबत भाड्याने राहणाऱ्यांनाही नवीन वाहन खरेदी करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, या वेळी परिवहन विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या फेसलेस सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.