

First box of Devgad Hapus sold
esakal
तुर्भे : जगभरातील खवय्यांना वेड लावलेल्या कोकणातील हापूसची सहा डझनांची पहिली पेटी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर दाखल झाली होती. देवगड हापूसला हा मान मिळाला असून या पिकलेल्या आंब्यांना २५ हजार रुपयांचा आजवरचा सर्वाधिक भाव मिळाला आहे, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली. मंगळवारी बोली लावून या पेटीची विक्री करण्यात आली. एपीएमसीच्या फळ बाजारात दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मुहूर्ताचा हापूस दाखल होतो.