
Stampede in Bageshwar Baba Event : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबांच्या भिवंडीतील सत्संगाच्या कार्यक्रमाला लोकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळं लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच धीरेंद्र शास्त्री यांनी स्टेजवरुन काढता पाय घेतला.