फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने कल्याणमध्ये धडक मोर्चा

रविंद्र खरात 
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

कल्याण - कल्याण पूर्वमध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा. सूचक नाका ते श्रीराम टॉकीज पुणे लिंक रोड रस्ता रुंदीकरण काम पूर्ण करा. तर दुकानदार आणि व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये. पाणी समस्या दूर करा. अश्या मागणी करत कल्याण पूर्व मधील फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने कल्याण पूर्व मधील ड प्रभाग क्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला. 

कल्याण पूर्व मधील अनेक वर्षे पुणेलिंक रोड रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे. सूचक नाका ते श्रीराम टॉकीज हा रस्ता 80 फूट रस्ता रुंदीकरण करताना सर्व सामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोझर घातला मात्र ज्या टोलेजंग इमारती तोडल्या नाही यामुळे अनेक ठिकाणी फुटपाथ, गटार आणि रस्ते अर्धवट रखडला आहे. पालिका हद्दीत मंगळवारी पाणी कपात होते मात्र नागरिकांना कल्याण पूर्व अनेक भागात बुधवारी पाणी मिळत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी समस्या आहेत. फेरीवाला धोरण जाहीर करून मग आंनलबजावणी करत नाही तो पर्यंत फेरीवाल्याना बसू द्या, दुकानदारांनी आपले अतिरिक्त बोर्ड काढले तरी पालिका दुकानदारांना वेठीस धरले जात असून ती त्वरित कारवाई थांबवा या मागणीसाठी आज शुक्रवार ता 11 जानेवारी रोजी 
दुपारी बारा वाजता ड प्रभाग क्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला. 

यात माजी नगरसेवक महादेव रायभोळे, दलित मित्र अण्णा रोकडे, भीमराव डोळस, कल्याण पूर्व विधानसभा शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद पाटील आदींच्या शिष्टमंडळाने प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोगांडे, पाणी पूरवठा विभाग उप अभियंता अशोक घोडे यांची भेट घेऊन निवेदन देत समस्या मांडली. आयुक्त यांच्यासमवेत बैठक लावावी अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी फुले शाहू आंबेडकर विचारमंच अध्यक्ष महादेव रायभोळे यांनी दिला असून पालिका काय कारवाई करते याकडे लक्ष्य लागले आहे.

Web Title: dhadak Morcha in Kalyan on behalf of Phule Shahu Ambedkar Samiti Forum and Merchant Friends Board