esakal | धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, किरीट सोमय्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, किरीट सोमय्यांची मागणी

धनंजय मुंडे  यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, किरीट सोमय्यांची मागणी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बोलविण्यात आली होती.  या पार्श्वभूमीवर  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

पवार साहेब नाटक करत असल्याची टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.  रेणू शर्मा यांच्यावर कोणतेही आरोप होऊ देत. पण त्यामुळे धनंजय मुंडे  यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पवार साहेबांच्या एक डझन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील. तीन लग्नाची चौकशी करा अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली आहे. धनजंय मुंडे यांचे तीन महिलांसोबत संबंध होते. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला कशी आहे, याची पोलिसांनी चौकशी करावी. मात्र, धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत ही गोष्ट का लपवून ठेवली. धनंजय मुंडे यांनी काहीतरी केलं असेल म्हणूनच संबंधित महिला त्यांना ब्लॅकमेल करत असेल. अशी व्यक्ती मंत्रिपदावर राहूच शकत नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

हेही वाचा-संक्रात झाली गोड! एकेकाळी मुंबईचे हॉटस्पॉट ठरलेल्या या भागात कोविडचा एकही रुग्ण नाही

पदावर असताना निपक्ष चौकशी होऊच शकत नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला अटक झाल्यानंतर त्यांच्यावर देखील सोमय्या यांनी टीका केली आहे.

Dhananjay Munde case bjp leader Kirit Somaiya cirtcism ncp chief Sharad Pawar

loading image