राज ठाकरेंच्या चौकशीवर धनंजय मुंडेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या चौकशीवर धनंजय मुंडेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई : लोकसभेच्या काळात लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदी शहांचं जे पितळ राज ठाकरेंनी उघडं केलं. तो सूड घेण्यासाठीच त्यांना ईडीनं नोटीस पाठवली असल्याचं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.

'तख्त बदलते देर नही लगती' आज तुम्ही सत्तेत आहात आम्ही उद्या सत्तेत आल्यावर हेच करायचं का अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारचं हे राजकारण लोकशाहीसाठी घातक असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हंटलं आहे.

सरकारच्या नेतृत्वावर जो व्यक्ती टीका करतो. त्या व्यक्तीला कुठल्या न् कुठल्या माध्यमातून त्रास द्यायचा ऐकलं तर आपल्या पक्षात घ्यायचं नाही ऐकलं तर त्याच्यामागे चौकशी लावायची हे लोकशाहीसाठी घातक असल्याचं मुंडे यांनी म्हंटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com