धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर कृष्णा हेगडे म्हणतात...

पूजा विचारे
Friday, 22 January 2021

मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेनं आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला होता. तक्रार मागे घेतल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी समाधान व्यक्त केलं.

मुंबईः  सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.  बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं तसं पोलिसांना लेखीही लिहून दिलं आहे. दरम्यान मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेनं आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी केला होता. आता रेणू शर्मानं तक्रार मागे घेतल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

कृष्णा हेगडे म्हणाले की, रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली हे मला प्रसारमाध्यमातून समजलं. धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मी 10 वर्षांपूर्वीही या महिलेबद्दल काही बोललो नाही. आता ही बोलणार नाही. शेवटी ती एक महिला आहे. धनंजय मुंडे एक मोठं नेतृत्व आहे. अशा घटनांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. शेवटी मी एकच म्हणेल सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया कृष्णा हेगडे यांनी दिली आहे. 

रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. बलात्कार प्रकरणी राजकारण होत असल्याने आणि घरगुती कारणामुळे, ही तक्रार मागे घेताना सांगितलं आहे. रेणू शर्मानं तसं पोलिसांना लेखीही लिहून दिलं आहे.  त्यामुळे तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नेमकं काय आहे प्रकरण?

स्वत:  धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलास केला होता. धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचं देखील सांगितलं. पहिल्या पत्नीपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं होतं. 

हेही वाचा- Unmasking Happiness| पोस्ट कोविड मानसिक आजारात वाढ

दरम्यान रेणू शर्माने धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करत दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Dhananjay Munde Renu Sharma complaint Krishna Hegde reacts Satyamev Jayate


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Renu Sharma complaint Krishna Hegde reacts Satyamev Jayate