esakal | रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार

धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे.

रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची पोलिसात तक्रार

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात आता भाजप आणि मनसे पदाधिकारी यांच्यासह मुंडे यांच्या नातेवाईकांनी ही तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रार दाखल केली आहे.  2019 पासून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं केंद्रे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

ब्लॅकमेल करणे, त्रास देणे अशा प्रकारचा त्रास रेणू शर्मा यांच्याकडून दिला जात होता, असं केंद्रे यांनी अपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात तक्रार नोव्हेंबरमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना तूर्तास दिलासा

धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले असताना पक्षाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं समजतंय. 

हेही वाचा- धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, किरीट सोमय्यांची मागणी

रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बोलविण्यात आली होती. ही बैठक तीन तास चालली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,  सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख,  जयंत पाटील,  जितेंद्र आव्हाड उपस्थित होते . ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक झाली.

 Dhananjay Munde sister in law lodged a complaint police Station renu sharma

loading image
go to top