उद्या रेणू शर्मा माध्यमांसमोर करणार धनंजय मुंडे प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट

सुमित बागुल
Friday, 15 January 2021

उद्या रेणू शर्मा पोलिसांमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहे.

मुंबई : धनंजय मुंडे प्रकरण सध्या प्रचंड तापलंय. एकीकडे रेणू शर्माने आपल्या ट्विटमध्ये आपण एक पाऊल मागे घेत असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे तिच्या वकिलाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेतलीये. उद्या रेणू शर्मा पोलिसांमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवणार आहे. कालही जबाब नोदनवण्यात आला, मात्र साडे चार तास जबाब नोंदवून देखील पूर्ण जबाब नोंदवला गेला नाही. त्यामुळे उद्या पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी जाणार असल्याचं रेणू शर्माच्या वकिलाने म्हंटले आहे. उद्या रेणू शर्मा या देखील माध्यमांशी बोलतील असं रमेश त्रिपाठी यांनी म्हटलंय. 

दरम्यान, याबाबत माध्यमांशी बोलताना काल संध्याकाळपासून आपल्याला धमक्या येत असल्याचंही त्रिपाठी म्हणालेत. दर दोन मिनिटांनी मला धमकीचा फोन येत आहे. आपल्याला तब्बल दोनशेपेक्षा जास्त धमकीचे फोन आल्याचं रेणूचे वकील रमेश त्रिपाठी म्हणालेत. याप्रकरणी आपण मुंबईचे ACP यांना ई-मेल करून उद्या अकरा वाजता जबाब नोंदवायला येत असल्याचं म्हटलंय. 

महत्त्वाची बातमी : मुंबई विद्यापीठाचा पराक्रम तरी वाचा, वाचल्यावर नक्की म्हणाल काही लाज, लज्जा, शरम ?

हनी ट्रॅप वगैरे काही नाही.. 

माझ्या आशिलावर जे आरोप लावले जातायत ते आम्ही वाचलेत. ज्यामध्ये माझ्या अशिलाकडून हनी ट्रॅप लावल्याचं बोललं जातंय. मात्र असं काहीही नाही. माझ्यावर देखील केस करून खोटे आरोप लावले जातायत. आमच्यावर लावण्यात आलेले आरोप हे मूळ केसला बगल देण्यासाठी केले जात आहेत. जबरस्ती कुणालाही त्रास देण्याचा माझ्या अशिलाचा बेत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, ते आम्ही पोलिस आणि कोर्टात देऊ. 

धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या केसशी आमचा काहीही संबंध नाही. दोन्ही सख्या बहिणी असल्या म्हणून माझ्या अशिलावर रेप करण्याचा अधिकार मिळत नाही. काल आमचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालंय, उद्या बाकीचे उरलेलं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाणार आहे. आमच्या आशिल उद्या सगळं तुमच्या समोर मांडतील. मूळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी इतर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. 

महत्त्वाची बातमी : पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? जयंत पाटील यांची थेट प्रतिक्रिया

केस सोडण्यासाठी माझ्यावर दबाव

केस सोडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जातोय, मला धमक्या देऊन दबाव टाकण्यात येतोय. विकीलाला घाबरवण्यापेक्षा न्यायालयात तुमच्यावरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करा. आम्ही गृहमंत्री आणि ACP  यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल, अशी अशा रेणू शर्माच्या वकिलाने आजमाध्यमांसमोर बोलून दाखवली.  

dhanjay munde controversy renu sharma to speak to media on saturday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhanjay munde controversy renu sharma to speak to media on saturday