मुंबई विद्यापीठाचा पराक्रम तरी वाचा, वाचल्यावर नक्की म्हणाल काही लाज, लज्जा, शरम ?

मुंबई विद्यापीठाचा पराक्रम तरी वाचा, वाचल्यावर नक्की म्हणाल काही लाज, लज्जा, शरम ?

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका रात्र महाविद्यालयातील विद्यार्थी सहन करत आहेत. रात्र महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 12 विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने तब्बल दोन वर्षांपासून रोखला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी व पुढील शिक्षणापासून मुकावे लागले लागत आहे. परीक्षा विभागात अनेक फेऱ्या मारल्यानंतरही निकाल हाती मिळत नसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. 

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात व्यत्यय येणारे विद्यार्थी रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतात. दिवसभर काम करून अनेक विद्यार्थी रात्री शिक्षण घेतात. रात्र महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. नोकरी व व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रात्र महाविद्यालय दिलासा ठरते. मात्र मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे या विद्यार्थ्यांवर शिक्षण नको अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कांदिवली येथील प्रियदर्शनी नाईट सिनियर कॉलेजच्या कॉमर्स शाखेतील 12 विद्यार्थ्यांचे अंतिम सत्राच्या निकालाची गुणपत्रिका दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आलेले नाहीत. यामध्ये 2019 पासून 10 विद्यार्थ्यांना तर, 2015 पासून दोन विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आली नाही. 

अंतिम वर्षाची गुणपत्रिका मिळावी यासाठी विद्यार्थी वारंवार परीक्षा विभागाकडे फेऱ्या मारत आहेत. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडून आकारलेला दंडही भरला आहे. मात्र तरीही परीक्षा विभाग विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास टाळाटाळ करत आहे. निकाल प्रलंबित का ठेवण्यात आला आहे, याबद्दलही परीक्षा विभागाकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे प्रलंबित ठेवलेले निकाल मिळावे यासाठी महाविद्यालयाकडूनही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला विनंती करण्यात आली आहे. मात्र गुणपत्रिका देण्यासाठी परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांकडून पैशांची किंवा भेट वस्तू देण्याची मागणी करण्यात येत आहे. परीक्षा विभागाच्या या मागणीसमोर महाविद्यालयही हतबल ठरले आहे. परीक्षा विभागाने गुणपत्रिका न दिल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या तसेच पुढील उच्च शिक्षणाच्या संधी गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परीक्षा विभागातील काही लालची अधिकाऱ्यांच्या हव्यासापोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होत आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. 
 
अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी : 

परिस्थिती नसतानाही काम करून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी विद्यापीठाकडून त्याचे खच्चीकरण करण्यात येत आहे. रात्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबाबत भेदभाव करू नये. परीक्षा विभाग दोन वर्षे त्यांच्या भवितव्याशी खेळत आहे, हे अत्यंत दयनीय आहे. विद्यार्थ्यांचे निकाल रोखणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. 

- सुधाकार तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ 

परीक्षेची गुणपत्रिका मिळावी यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांनी दंडही भरला आहे. परंतु काही अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. वारंवार विनंती करूनही परीक्षा विभाग विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. आता आम्हीही विद्यापीठाच्या कारभारापुढे हात टेकले आहेत. 

- प्रकाश मखिजा, मुख्याध्यापक, प्रियदर्शनी नाईट सिनियर कॉलेज

night college students did not get results since last two years shameless behavior of university of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com