Dhannajay Munde: "नाकाला धार लागली तरी रुमाल घेऊन जाईन"; तटकरेंनी कान टोचल्यानंतर धनंजय मुंडेंची टिप्पणी

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भुजबळांपासून मुश्रीफांपर्यंत सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले.
Dhananjay Munde|Bajrang Sonawane
Dhananjay Munde|Bajrang SonawaneEsakal

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन साजरा होतो आहे. या निमित्त पक्षासाठी काम करण्यावरुन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले. यामध्ये छगन भुजबळांपासून हसन मुश्रीफांपर्यंत सर्वांचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या या भूमिकेवर भाष्य करताना आता कोणा सहकार्याच्या नाकाला धार जरी लागली तरी रुमाल घेऊन जाईल, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलातना केली. (Dhannajay Munde comment on Sunil Tatkare at NCP anniversary programme in Mumbai)

Dhananjay Munde|Bajrang Sonawane
Mohol Vs Sule: "सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना..."; खासदार मुरलीधर मोहोळांची सुप्रिया सुळेंवर सडकून टीका

नाकाला धार लागली तरी रुमाल घेऊनच जाईन - मुंडे

मुंडे म्हणाले, "माझा २०१४ साली माझा पराभव झाला तरी माझ्यावर वरिष्ठ सभागृहाची‌‌ जबाबदारी अजित दादांनी ‌दिली. पक्ष वाढीसाठी मला सर्दी पडसं झालं तरी मी जाईल. जोपर्यंत आपला विजय होत नाही तोपर्यंत मी काम करेन. एवढंच नाहीतर कोणा सहकाऱ्यांच्या नाकाला धार लागली तर रुमाल घेऊन जाईल" अशा शब्दांत त्यांनी तटकरेंच्या टिप्पणीवर भाष्य केलं.

Dhananjay Munde|Bajrang Sonawane
Sunil Tatkare: "यशवंतरावांच्या विचारांचा ढिंढोरा पिटणाऱ्यांनी..."; तटकरेंचा शरद पवारांवर निशाणा

काय म्हणाले होते तटकरे?

सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले, "पक्षाच्यावतीनं आम्ही जो कार्यक्रम देऊ त्याला कार्यकर्ते तर येतीलच पण सर्व नेत्यांनीही तयार रहायचं आहे. आपल्या सर्व विधानसभा आमदारांचा मतदारसंघ अधिवेशनापूर्वी काही आणि नंतर अचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला फिरायचं आहे. एका मतदारसंघात दोन दोन वेळेला जावं लागेल तर त्यावेळी सर्व वरिष्ठ नेत्यांना यावंच लागेल"

प्रफुल्लभाई मी तुमच्यापेक्षा वयानं मोठा असलो तरी विनंतीच करतो. पण तुम्हालाही आता वेळ काढावाच लागेल. तसंच द ग्रेट छगन भुजबळ! १९९९ ला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले छगन भुजबळ सुनील तटकरेला २०२४ मध्ये पण हवे आहेत, हे मी जाहीरपणे विनंती करतो. दिलीपराव तुम्हीसुद्धा. धनंजय मुंडेंनी विदर्भापासून सर्व जिल्ह्यात हल्लाबोल केला, पण तुम्हाला आता सुट्टी नाही. सर्दी झालं, पडसं झालं हे मी आता ऐकणार नाही. पूर्णवेळ! मुश्रीफसाहेब तुम्ही फक्त कोल्हापुरचे नेते नाही आहात महाराष्ट्राचे आहात. पक्षाचा अध्यक्ष म्हणून ज्याला ज्याला जे सांगितलं जाईल ते ऐकावं लागेल, अस यावेळी सुनील तटकरे यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांना सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com