
आजच एनसीबीकडून दीपिका पादूकोण आणि श्रद्धा कपूरचीही चौकशी करण्यात आली आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आत्महत्या की हत्या यावरून सुरु झाला होता. मात्र आता या तपासाला फाटे फुटले असून ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या ड्रग्ज कनेक्शन तपासाचा व्याप देखील दिवसेंदिवस वाढतच चालला असून संपूर्ण बॉलिवूडच या प्रकरणाने धास्तावलेलं आहे. नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने या ड्रग्ज प्रकरणी शनिवारी आणखी एकाला अटक केली आहे.
हेही वाचा - बिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडे उतरणार राजकारणात; सत्ताधाऱ्यांना देणार साथ
मिळालेल्या माहितीनुसार धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला या प्रकरणी अटक झालेली आहे. रिया चक्रवर्ती आणि तीचा भाऊ अटकेत आहेच. त्यानंतर, या प्रकरणात रकूलप्रीत सिंह, श्रद्धा कपूर, साराह अली खान यांचेही नावे आलेली होते. आजच एनसीबीकडून दीपिका पादूकोण आणि श्रद्धा कपूरचीही चौकशी करण्यात आली आहे.
काल शुक्रवारी एनसीबीने क्षितिज प्रसादसोबत रात्री उशिरापर्यंत चौकशी केली होती. इतकंच नव्हे तर त्याच्या घराची तपासणीही केली होती. असं म्हटलं जात आहे की, धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिजचे नाव हे अटकेत असणाऱ्या ड्रग्ज पॅडलर अंकूश अरनेजाकडून आलं आहे. क्षितिज हा करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनशी निगडीत असल्याचं एनसीबीने म्हटलं असलं तरीही करण जोहर यांनी आपण क्षितीजला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. यात ड्रग्जचा वापर झाला होता अशी चर्चाही झाली होती. या चर्चेला पुर्णविराम देत करण जोहरने आपल्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, 2019 मध्ये त्याच्या घरी झालेल्या पार्टीत कसल्याही ड्रग्जचा वापर केला गेला नव्हता. या पार्टीत दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जून कपूर आणि इतरही काही सेलिब्रिटी सामील होते.