Dharavi Bachav Morcha: "मातोश्री 2 च्या विकासासाठी धारावीच्या विकासाला विरोध"; भाजपच्या 'या' आरोपाला अंधारेंचं प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी बचवा मोर्चाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे.
Sushma Andhare slam devendra fadnavis
Sushma Andhare slam devendra fadnavis sakal

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी बचवा मोर्चाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा धारावी ते बीकेसीतील अदानी कार्यालयापर्यंत निघाला. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या गटनेत्या सुषमा अंधारे मोर्चाचा हेतू स्पष्ट केला. तसेच मातोश्री 2च्या विकासासाठी धारावीच्या विकासाला ठाकरे गटानं विरोध केला असल्याचा भाजपनं आरोप केला होता. या आरोपालाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. (Dharavi Bachav Morcha Sushma Andhare gives answer to bjp alligation of Matoshree 2)

Sushma Andhare slam devendra fadnavis
Mahesh Kumawat: संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक; कोण आहे हा तरुण?

अंधारे म्हणाल्या, "कुठल्या प्रकारच्या विकासाच्या बाता मारल्या जात आहेत. मला नाही वाटत की यांचा काही विकास-बिकास चालू आहे. पण अदानींना वाचवण्यासाठी 'सब भूमी अदानीकी' म्हणून हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळं भाजपच्या बाष्कळ टिकेकडं आम्ही फारसं लक्ष देत नाही. मातोश्री २ चा खर्च धारावीतून वसूल करायचा अशी टीकाही केली जात आहे, अशी बडबड आमचे बारके बारके भाचे करत आहेत त्यांची बडबड आम्ही एन्जॉय करतो. (Latest Marathi News)

Sushma Andhare slam devendra fadnavis
Dharavi Bachav Morcha: 'धारावी बचाव मोर्चा'कडं धारावीकरांची पाठ? मोर्चाला अद्याप सुरुवात नाही!

मी कायम म्हणते की शिवसेनेची सध्या महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्राची सत्ता-मत्ता, अस्मिता कोण राखू शकतं तर ती फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि केवळ शिवसेनाच राखू शकते. भाजपच्या वळचणीला गेलेली एकूण सर्व गद्दर गँगला इथल्या मराठी माणसाचं हितासाठी कधीही बोलू शकणार नाही. (Marathi Tajya Batmya)

Sushma Andhare slam devendra fadnavis
Mahesh Kumawat: संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक; कोण आहे हा तरुण?

आम्ही मातोश्रीवर राहतो का?

आज अदानींच्या वीज कंपनीची ७० हजार कनेक्शन या धारावीत आहेत. त्यांचे वीजेचे आकडे काय आहेत हे मीटर कुठून येतात. याचा कधीतरी शिंदे गटानं विचार केला आहे का? निवडणुका येतील आणि जातील पाण राहिला प्रश्न मातोश्री 2 चा तर मी राहते का मातोश्रीवर? आणि हे लोक मातोश्रीवर राहतात का? हे सगळे लोक का आले आहेत कारण इथं मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न विचारला जात आहे, अशा शब्दांत अंधारेंनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

Sushma Andhare slam devendra fadnavis
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी असणार लाेकायुक्तांच्या कक्षेत! जाणून घ्या लोकायुक्त कायद्याची वैशिष्ट्ये

टीडीआर घोटाळा झाला हे सरकारला मान्य

टीडीआर घोटाळा ठाकरे सरकारचं पाप आहे, असा आरोपही भाजपनं केला आहे. याला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाले, शिंदे गट आता प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं ते रॅप साँग करतील, लावण्या करतील, ऐन दिवाळीत गौतमी पाटीलला आणून लावण्या घडवतील, ते काहीही करु शकतात.

आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी गमतीदार पद्धतीनं एन्जॉय करतो फक्त. राहिला प्रश्न टीडीआर घोटाळ्याचा हे ते मान्य तरी करत आहेत. मग या घोटाळ्याची चौकशी करा असं आम्ही म्हणतो आहोत तर मग घाबरता कशासाठी? मागे काशाला फिरता त्यासाठी, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com