

Dharavi Redevelopment
ESakal
मुंबई : धारावीतील जास्तीत जास्त रहिवाशांना पुनर्विकासाचा लाभ मिळावा, यासाठी इथल्या स्थानिक नगरसेवकांनी धारावी पुनर्विकास प्राधिकरणासोबत (डीआरपी) खांद्याला खांदा लावून काम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणातील 'प्रलंबित' आणि 'अनिर्णित' प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी डीआरपी आणि स्थानिक नगरसेवकांच्या एकत्रित प्रयत्नांतून १४ मे ते २६ मे पर्यंत, धारावीत कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.