
मुंबईत धारावी बस डेपो समोर सिलिंडरच्या ट्रकमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तर स्फोटानंतर ट्रकला आग लागलीय. यात ट्रक जळून खाक झाला असल्याची माहिती समजते. स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करत आहे.