esakal | धारावी गॅस सिलिंडर दुर्घटना; सायन रुग्णालयात 28 वर्षीय मुलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

 Cylinder explosion

धारावी गॅस सिलिंडर दुर्घटना; सायन रुग्णालयात 28 वर्षीय मुलीचा मृत्यू

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : धारावी (Dharavi), शाहू नगर, कमलानगर, मुबारक हॉटेलसमोरील एका चाळीच्या ठिकाणी रविवारी दुपारच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट (Gas Cylinder explosion) होऊन त्यात 17 जण जखमी झाले होते. या सर्वांवर पालिकेच्या (bmc) सायन रुग्णालयात (sion hospital) उपचार सुरू असून आतापर्यंत तीन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 28 वर्षीय अंजू गौतम या मुलीचा (Anju Gautam death) मृत्यू झाल्याची माहिती सायन रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही 1 गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: BMC: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प; महालक्ष्मी येथे पथदीवे उजळणार

धारावी सिलेंडर स्फोट प्रकरणात शुक्रवारी तिसरा मृत्यू झाला. आपल्या भावाच्या हातावर सुरक्षिततेचे बंधन बांधण्यासाठी बनारसहून मामाच्या घरी आलेल्या अंजू गौतम (28) हीने महापालिकेच्या सायन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सध्या 10 रूग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी 1 ची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात जवळच राहणारे एकूण 17 लोक गंभीर जखमी झाले. सर्वांना महापालिकेच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 ऑगस्ट रोजी 7 वर्षीय सोनू जयस्वालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी सोनूची आई सत्रा देवी (40) हिचा मृत्यू झाला.

कुटुंबातील शेजाऱ्यांनी सांगितले की, सोनूची मावशी आणि तिची मुलगी अलीकडेच रक्षाबंधन साजरी करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. त्याही या अपघाताचा बळी ठरल्या. सोनूला राखी बांधण्यासाठी आलेल्या बहीण अंजू गौतम हिचाही शुक्रवारी मृत्यू झाला. सायन रुग्णालयाच्या उप अधिष्ठाता  डॉ.विद्या महाले यांनी सांगितले की, 28 वर्षीय महिलेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सध्या रुग्णालयात 1 रुग्णाची प्रकृती गंभीर आहे, उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

loading image
go to top