esakal | BMC: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प; महालक्ष्मी येथे पथदीवे उजळणार
sakal

बोलून बातमी शोधा

bmc project

BMC: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प; महालक्ष्मी येथे पथदीवे उजळणार

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : महालक्ष्मी (mahalaxmi) येथे कचऱ्यापासून वीज निर्मीतीचा प्रकल्प (Electricity project) महानगरपालिकेने (bmc) उभारला आहे. महालक्ष्मी येथे हा प्रकल्प उभारण्याच आला आहे. प्रकल्पातून महालक्ष्मी येथील केशवराव खाडे चौकाचे पथदीवे (street light) उजळणार असून पालिकेच्या उद्यानातही (BMC garden) वीज वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा: एमपीएससीच्या परीक्षार्थींना लोकल प्रवास खुला; हॉल तिकीट दाखवून मिळणार तिकीट

या प्रकल्पात 2 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन रोज 300 युनिट विज निर्मीती होणार आहे.यातील 180 युनिट विजेचा वापर पथदिव्यांसाठी करण्यात येणार तर उर्वरीत विज ही परीसरातील उद्यानातील दिव्यांसाठी वापरण्यात येणार आहे.असे महानगर पालिकेकडून सांगण्यात आले.पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले. बायोमिथेनाझेशन च्या तंत्राचा वापर करुन ही विज निर्माण केली जाणार आहे.या विजे मुळे विज बिलापोटी येणार आर्थिक भार कमी होणार आहे.असा दावाही प्रशासनाने केला.

डंपिंगवर येणारा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने मोठ्या संकुलांमध्ये ओल्या कचर्यावर प्रक्रीया करणे बंधनकार केले आहे.पालिकेच्या डि प्रभागात रोज 200 मेट्रीकटन ओला कचारा निर्माण होतो.त्यातील 2 टन कचर्यावर येथे प्रक्रीया करण्यात येणार आहे.हा प्रकल्प 90 लाख रुपयांचा असून यासाठी सीएसआर मधून निधी मिळवण्यात आला आहे.

हेही वाचा: केंद्रशासित दमण मध्ये घुमला 'जय भवानी जय शिवाजी'चा गजर

प्रक्रिया करा सूट मिळवा

थेट डंपिंगवर कचर्याचे वर्गिकरण करुन प्रक्रीया करणे अशक्यप्राय गोष्ट आहे.त्यामुळे कचरा निर्माण होणार्या ठिकाणीच प्रक्रीया करुन विल्हेवाट लावण्यावर पालिका भर देत आहे.त्यासाठी करदात्यांना काही करांमध्ये सुट देण्याचाही पालिकेचा विचार आहे.मोठ्या संकुलांमध्ये ओल्या कचर्यावर प्रक्रीया होत असल्याने डंपिंगवर येणार्या कचर्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दोन वर्षांपूर्वी दररोजचे सात ते साडेसात हजार मेट्रिक टनांपर्यंत असणारे कचर्‍याचे प्रमाण आता साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टनांपर्यंत खाली आले आहे.

अशी होईल वीज निर्मीती

कच-यापासून प्रथम गॅस निर्मिती करण्यात येईल. त्यानंतर या गॅसचा उपयोग करुन जनित्राच्या आधारे वीज निर्मिती केली जाणार आहे.साधारण 300 युनिट पर्यंत विज निर्मीती होईल असा अंदाज आहे.

loading image
go to top