नागपूरमध्येही धारावी पॅटर्न? आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मायक्रोप्लॅनिंग!

समीर सुर्वे
Monday, 31 August 2020

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागपूरमध्येही धारावी पॅटर्न राबवला जाण्याची शक्‍यता आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली येत्या शुक्रवारी राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे पथक नागपूरला जाणार आहे. 

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागपूरमध्येही धारावी पॅटर्न राबवला जाण्याची शक्‍यता आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली येत्या शुक्रवारी राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे पथक नागपूरला जाणार आहे. 

ही बातमी वाचली का? राज्यातील 'या' पाच जिल्हयांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 400 टक्‍क्‍यांनी वाढ

जुलै ते ऑगस्टदरम्यान नागपुरामधील कोरोना रुग्णांची संख्या 341 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. तसेच मृत्युदरातही वाढ होत आहे. तत्कालिन महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्य सरकारने गेल्या आठवड्यात त्यांची नागपूर महापालिका आयुक्त पदावरून बदली करून त्या पदावर राधाकृष्ण बी यांची नियुक्ती केली आहे. 

ही बातमी वाचली का? पाण्याची समस्या मिटली, राज्यातली धरणं काटोकाट भरली!

कोरोना उपचाराबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ डॉक्‍टरांची टास्क फोर्स तयार केली आहे. या टास्क फॉर्समधील काही तज्ज्ञ डॉक्‍टर आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांच्यासह नागपूरला जाणार आहेत. आयुक्तांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नागपूरमध्ये प्रत्येक परिसराचे मायक्रो प्लॅनिंग करून त्या दृष्टीने उपाय करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागानुसार उपाययोजना केली जाण्याची शक्‍यता आहे. 

ही बातमी वाचली का? महाराष्ट्रात 292 हेल्थ केअर वर्करचा कोरोनाने मृत्यू; देशापेक्षा राज्यात कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक

फिलिपिन्सकडूनही अंमलबजावणी 
धारावीत महापालिकेने तपासणी, चाचणी, उपचार या त्रिसूत्रीचा वापर करून संसर्गावर तसेच मृत्युदरावरही नियंत्रण आणले आहे. त्याच धर्तीवर नागपुरातही उपाय राबविले जाण्याची शक्‍यता आहे. धारावीतील ही त्रिसूत्री फिलिपिन्समध्येही राबवली जात असून जगभरात धारावी पॅटर्नची स्तुती करण्यात आली आहे. 
------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dharavi pattern in Nagpur too? Microplanning under the leadership of the Commissioner!