राज्यातील 'या' पाच जिल्हयांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 400 टक्‍क्‍यांनी वाढ

राज्यातील 'या' पाच जिल्हयांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 400 टक्‍क्‍यांनी वाढ
राज्यातील 'या' पाच जिल्हयांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 400 टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबई : बीड, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक असून, बाधितांच्या संख्येत मागील पाच महिन्यात या जिल्ह्यांमध्ये 400 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये आवश्‍यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे. 

गेल्या महिन्याभरात बीड जिल्ह्यातील रूग्णसंख्या 603 टक्‍क्‍यांनी वाढली असून, मृत्यूदर हा 521 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. सांगली जिल्ह्यात रूग्णसंख्या 543.2 टक्‍क्‍यांनी तर मृत्यूदर 632 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात मृत्यूंची संख्या 55 होती ती 403 वर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यात रूग्णसंख्येत 872 टक्‍क्‍यांनी तर मृत्यूदरात 223 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात नागपूरमध्ये 68 मृत्यूंची नोद झाली होती. तर ऑगस्टमध्ये हा आकडा 670 वर पोहोचला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्णसंख्येत 350 टक्‍क्‍यांनी तर मृत्यूदरात 120 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. कोल्हापुरात रूग्णांच्या संख्येत 402 टक्‍क्‍यांनी तर मृत्यूदरात 551 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. कोल्हापूरात रूग्णांचा आकडा वाढत असून, शनिवारी एका दिवसात 300 रूग्णांची भर पडली आहे. 

सांगलीमध्ये गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत. काही रुग्णांलयांमध्ये कृत्रिम श्‍वसनयंत्रणा (व्हेंटीलेटर), अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधा उपलब्ध नाही. तर अनेक खासगी रूग्णालयांत कर्मचाऱ्यांना तुटवडा आहे. याशिवाय येथील रूग्णालयांत कोकणासह कर्नाटकातील अनेक रूग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्यावर ही उपचार करण्यात येत असून, मिरज कुपवाडा पालिकेने 125 खाटांचे जम्बो कोव्हिड केंद्र उभारले आहे. सरकारने सांगितलेल्या निर्देशांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून, मास्क किंवा सामाजिक अंतर राखत नसल्याचे पाहायला दिसून येत आहे. 
- डॉ. रविंद्र ताटे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली-मिरज-कुपवाडा 

शहरांना कोरोना नियंत्रणात यश 
राज्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड यांसारख्या शहरातील रूग्णालयात ग्रामीण भागातील गंभीर रूग्णांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात दाखल केले जात आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांपैकी 57 टक्के रूग्ण हे या शहरात असले तरी कोरोनाला नियंत्रणात या शहरांनी काही प्रमाणात यश मिळवले आहे. मुंबईत जुलै ते ऑगस्ट या कालावधीत रुग्णांच्या संख्येत 28.04 टक्के, ठाण्यात 43.08 टक्के तर पुण्यात 104.3 टक्के वाढ झाली आहे. 

जिल्हा रूग्णसंख्येतील वाढ मृत्यू दरातील वाढ (टक्‍क्‍यांत)
बीड 603 521
सांगली 543.2 632
कोल्हापूर 402 551 
नागपूर 885 223 
उस्मानाबाद 350 120

----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com