

Dharavi Premnagarcha Maharaja Ganesh Murti Accident
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबईत गणरायाच्या आगमन सोहळ्यादरम्यान मोठा अपघात झाला होता. दक्षिण मुंबईतील भुलेश्वर राजाची गणेश मूर्ती मिरवणुकीदरम्यान तोल गेल्याने कोसळली होती. या अपघातात २ जणांचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले होते. मुंबईतील ही घटना ज्वलंत असताना आता पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील धारावीच्या प्रेम नगरचा महाराजाचा या गणेशमूर्तीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.