Dombivli News : ध्रुही पाटीलची चमकदार कामगिरी; 36 किमीचे सागरी अंतर तिने एका दमात पार केले

ध्रुही हिने मालवण,विजयदुर्ग,मुंबई, येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली
dhruhi patil set record of alibag to gate way of india in swimming dombivli
dhruhi patil set record of alibag to gate way of india in swimming dombivlisakal

डोंबिवली - डोंबिवलीच्या ध्रुही पाटील या विद्यार्थीनीने धरमतर (अलिबाग) ते गेट वे ऑफ इंडिया असे 36 किमीचे सागरी जलतरण अंतर एका दमात पार केले आहे. 9 तास 23 मिनीटांत हे अंतर पार करण्याची कामगिरी तीने नुकतीच केली आहे.

8 तासात हे अंतर पोहून पार करण्याचा निर्धार तिने केला होता. मात्र समुद्रात पोहताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे तिला निर्धारीत वेळेत हे अंतर कापण्यात अडचणी आल्या. ध्रुही ही इरा ग्लोबल स्कूल मध्ये शिकत आहे.

ध्रुही हिने मालवण,विजयदुर्ग,मुंबई, येथे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. 20 ऑक्टोबर ला एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया 12 किलोमीटर सागरी जलतरण अंतर 3 तास 30 मिनिटात पोहून तिने पार केले आहे.

जिल्हा स्तरीय स्पर्धेत सुद्धा उत्तम कामगिरी केली आहे. 18 डिसेंबर ला पहाटे अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करुन 3 वाजून 26 मिनिटांनी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक श्री.सुनील पाटील यांच्या निरीक्षणाखाली धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया सागरी अंतर पोहण्यास सुरवात केली.

धरमतर (अलिबाग) ते गेटवे ऑफ इंडिया असे अंतर 8 तासात पोहून पार करण्याचा निर्धार केला होता.परंतु कासा खडक च्या पुढे सकाळी 10 वाजता अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ध्रुही ला वाऱ्यामुळे समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा मारा सहन करीत पुढे गेटवे पर्यंत पोहून जावे लागले. त्यामुळे तिला निर्धारित वेळेत अंतर कापण्यात अडचणी आल्या.

ध्रुही पाटील हिला महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना व ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच यश जिमखाना स्टाफ व प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले.

त्यामुळे ती हे अंतर यशस्वीरीत्या पार करू शकली. गेटवे ऑफ इंडिया ला पोहचल्यावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. 36 किमी.न थांबता पोहल्यामुळे तीच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ध्रुही चे प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली यश जिमखाना मध्ये दररोज 8 ते 9 तास प्रॅक्टीस करत होती तिची मेहनत व जिद्द पाहून यश जिमखाना मालक राजू वडनेरकर साहेबांनी तिला स्विमिंग पूल उपलब्ध करून या मोहिमेसाठी शुभेच्या दिल्या.

तसेच महिन्यातून 2 ते 3 वेळा उरण ला संतोष पाटील यांच्याकडे समुद्रात सराव करून घेतला.पुढील काळात तिला बाहेर देशातील इंग्लिश खाडी पोहायची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com