सावधान ! मधुमेह, उच्चरक्तदाब ठरतोय कोरोनाबाधितांमध्ये 'मृत्यू'चे कारण, तब्बल 'इतक्या' टक्के लोकांचा बळी

corona
corona

मुंबई : मुंबईत आतापर्यंत 1026 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंपैकी 67 टक्के लोकांना इतर ही आजार असल्याचे समोर आले आहे. इतर आजारांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे मुख्य आजार असून यामुळे 32 टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. मुंबईत गेल्या अडीच महिन्यात बाधित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून रुग्णांचा आकडा आतापर्यंत 31,789 वर पोचला आहे. आतापर्यंत 1026 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 3.2 टक्के इतका आहे. एकूण रुग्णांपैकी 40 टक्के महिला तर 60 टक्के पुरुष आहेत. तर एकूण मृत्यूंपैकी 37 टक्के महिला तर 63 टक्के पुरुष आहेत. 

एकूण मृत्यूंपैकी 67 टक्के रुग्णांना इतरही आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर आजारांचे प्रमाण लक्षात घेता मधुमेह 26 टक्के, उच्च रक्तदाब 24 टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे.  तर 32 टक्के प्रकरणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दोन्ही आजारांची लागण असल्याचे समोर आले आहे. मृतांपैकी 8 टक्के प्रकरणांमध्ये हृदयविकार व 10 टक्के प्रकारणांमध्ये इतर आजारांचा समावेश होता. पालिकेने मृतांच्या काढलेल्या निष्कर्षातून 60 वर्षांपेक्षा अधिक वय व समवेत इतर आजार असणे ही बाब जोखमीची असल्याचे मृत्यू प्रकरणांतून निदर्शनास आले आहे. तर 50 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मृत्यूंमध्ये ही 21 टक्के रुग्णांना इतर आजार देखील असल्याचे निदर्शनास आले आहे.

40 वयोगटातील रुग्णांना अधिक बाधा
वयोमानानुसार विचार केल्यास 24 मे पर्यंत 40 वयोगटातील 13,133 रुग्णांना सर्वाधिक बाधा झाली असून 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 0.5 टक्के इतके आहे. तर 40-60  वयोगटातील 11,517 रुग्णांना बाधा झाली असून त्यातील 456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे 4 टक्के इतके आहे. तर 60 वयोगटातील 5,709  रुग्ण बाधित झाले असून त्यातील 463 बधितांचा मृत्यू झाला आहे तर  त्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे 8.1 इतके सर्वाधिक आहे.

Diabetes, high blood pressure are the leading cause of death in coronary artery disease.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com