संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

ठाकरे सरकारवर निशाणा साधणाऱ्या विरोधकांना संजय राऊतांनी दिला डोस

मुंबई- एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट असतानाच दुसरीकडे राज्यातलं राजकारण ही चांगलचं पेटलं आहे. कोरोनाला राज्यात रोखण्यासाठी ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपनं केला. विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलनही पुकारलं. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ट्विट करुन राऊतांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे. 

यात राऊतांनी विरोधकांना तात्काळ क्वांरटाईन होण्याचा सल्लाही दिला आहे. त्याचसोबत राज्याला अस्थिर करण्याचा अंगलट येईल, असं म्हणत भाजपला टोला हाणला आहे. 

मोठी बातमी - महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...

संजय राऊतांनी काय म्हटलं आपल्या ट्विटमध्ये, कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे.. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. Boomerang...जय महाराष्ट्र.

भाजपचं आंदोलन 

ठाकरे सरकार राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या भाजपनं केला. त्यानंतर विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवन येथे जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसंच राज्यभरात महाराष्ट्र बचाओ आंदोलनही केलं. त्यानंतर भाजपनं ठाकरे सरकारविरोधात मेरा आंगण, मेरा रणांगण असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला. सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून, काळे फलक हातात घेऊन भाजपनं सरकारचा निषेध नोंदवला. भाजपच्या या आंदोलनावर महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेतेमंडळींनी टीका केली. 

हृदयद्रावक ! "...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो"; बेडसाठीची १२ तासांची फरफट व्यर्थ

या आंदोलनानंतर राज्यातलं राजकारण तापलं आहे. भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसह मोठ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. तसंच संजय राऊतही राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. एकंदर राज्यातील स्थिती पाहता भाजपनं ठाकरे सरकार पाडण्याचा विडा उचलला आहे. भाजपकडून तसे प्रयत्न केलेही जात आहेत आणि आता विरोधकांच्या या खेळीवर संजय राऊतांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

sanjay raut in action one more tweet regarding mahavikas aaghadi and opposition


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut in action one more tweet regarding mahavikas aaghadi and opposition