esakal | राज्यात कोरोनाचा भडका कायम ! दिवसभरात पुन्हा एकदा 2 हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

corona maharashtra

राज्यात कोरोनाचे आणखी 65 रुग्ण दगावले. मुंबईत 41, पुण्यात 13, नवी मुंबईत 3 आणि पिंपरी-चिंचवड, सोलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाचा भडका कायम ! दिवसभरात पुन्हा एकदा 2 हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फोफावत असून, बुधवारी आणखी 2250 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील बाधितांची एकूण संख्या 39,297 वर पोहोचली आहे. कोव्हिड-19 च्या 65 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1390 झाला आहे. त्यापैकी 27,581 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या विळख्यातून आणखी 679 जणांची सुटका झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 10,318 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

नक्की वाचा : आणखीन एक मोठा खुलासा ! असे सापडले होते 'गायब झालेले' अजित पवार....

राज्यात कोरोनाचे आणखी 65 रुग्ण दगावले. मुंबईत 41, पुण्यात 13, नवी मुंबईत 3 आणि पिंपरी-चिंचवड, सोलापूर, उल्हासनगर, औरंगाबाद येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांंमध्ये 46 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी 32 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 31 रुग्ण 40 ते 59  वयोगटातील व दोन रुग्ण 40 वर्षांखालील होते. त्यांच्यापैकी 48 जणांना (74 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 विषाणू संसर्गामुळे राज्यातील बळींची संख्या आता 1390 झाली आहे.

मोठी बातमी : महाभयंकर ! इटली नाही हे आहे ठाणे, कोरोनाग्रस्त रस्त्यावरच तडफडत होता, अँब्युलन्स आली तोवर 

  • नमुन्यांची तपासणी : 3,07,072
  • निगेटिव्ह : संख्या 39,297
  • पॉझिटिव्ह : 39,297
  • क्लस्टर कंटेनमेंट झोन : 1849
  • सर्वेक्षण पथके : 15,415
  • लोकसंख्येची पाहणी : 65.11 लाख 
  • बरे झालेले रुग्ण : 10,318 
  • होम क्वारंटाईन : 4,04,692
  • संस्थात्मक क्वारंटाईन : 4,04,692

Diagnosis of 2250 new patients total number is at 39,297 Death of 65 corona sufferers