esakal | "मी टेरेसवर फिरून येतो" म्हणून शाह गेलेत आणि खाली सापडली डेड...
sakal

बोलून बातमी शोधा

"मी टेरेसवर फिरून येतो" म्हणून शाह गेलेत आणि खाली सापडली डेड...

"मी टेरेसवर फिरून येतो" म्हणून शाह गेलेत आणि खाली सापडली डेड...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मुंबईत एका व्यापाऱ्याने १५ मजली इमारतीवरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. धिरेन शाह असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. धिरेन शाह हे दक्षिण मुंबईतील हिऱ्याचे व्यापारी आहेत. धिरेन शाह यांनी दक्षिण मुंबईतील प्रसाद चेंबर्स या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करताना धिरेन शाह यांनी स्वत:चा विडियो शूट करत आत्महत्या केली आहे.

मोठी बातमी - "कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

डायमंड पॉलिशिंग आणि एक्सपोर्ट कंपनीचे मालक असलेल्या धीरेन शाह यांचं प्रसाद चेंबर्सच्या पंधराव्या मजल्यावर ऑफिस आहे. शाह यांनी लिहिलेली दोन ओळींची सुसाईड नोटही पोलिसांना त्यांच्या डेस्कवर सापडली. ‘आत्महत्येसारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे, त्यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये’ असं शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

नक्की काय घडलं..

धीरेन शाह नेहमी प्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या कार्यालयात आले. सकाळी ९.५० च्या सुमारास आपण इमारतीच्या टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी जात आहोत, असं त्यांनी काही कर्मचाऱ्यांना सांगितलं. मात्र काही मिनिटांतच त्यांनी टेरेसवरुन उडी घेतली. उडी घेतान त्यांनी आपल्या मोबईलवरून विडियो शूट केला. त्यांच्या डेस्कवर पोलिसांना चिठ्ठी सापडली आहे. ‘आत्महत्येसारखं अत्यंत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे, त्यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये’ असं शाह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

मोठी बातमी -  उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

इमारतीवरुन खाली पडल्यानंतर धीरेन शाह यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे.

शाह दक्षिण मुंबईमधल्या नेपियनसी रोडवर राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत राहतो, शाहांच्याच व्यवसायाची परदेशातील जबाबदारी तो सांभाळतो.

diamond businessman dhiren shah take extreme step and finished his life in mumbai

loading image
go to top