हिरे, सोने खरेदीचे 220 व्यवहार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - हॉंगकॉंगमध्ये 990 कोटी पाठवण्यासाठी 220 वेळा हिरे व सोन्याची खरेदी झाल्याचे व्यवहार दाखवण्यात आले आहेत. त्यासाठी दाखवण्यात आलेल्या बिलांत दहा पट अधिक किमतीने माल खरेदी झाल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात पुढे आले आहे.

नोटाबंदीच्या काळात बॅंक खात्यात 92 कोटींच्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्यानंतर "ईडी'च्या रडावर आलेल्या राजेश्‍वर एक्‍सपोर्ट कंपनीकडून पुढे वर्षभरात 1,478 कोटींची रक्कम हॉंगकॉंग व दुबईत पाठवल्याचे पुढे आले आहे. त्यातील 990 कोटी हे नुकतीच अटक केलेल्या कृतिका दहाल हिच्या इंटरनॅशनल रायझिंग कंपनीला मिळाले आहेत. त्या बदल्यात हिरे व सोन्याच्या खरेदीचे 220 व्यवहार झाल्याचे कागदोपत्री दाखवले आहे. याप्रकरणी ईडीने 355 बिलांची छाननी केली. यात खरेदी केलेल्या हिरे व सोन्याच्या किमती 10 पटींनी जास्त दाखवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हे व्यवहार प्रत्यक्षात झाले आहेत का, याचा तपास ईडी करत आहे.

कृतिका दहाल हिने इंटरनॅशनल रायझिंग ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीची ती स्वतः संचालक, समभागधारक (शेअर्स) आहे. याशिवाय हॉंगकॉंगमधील बॅंक खातीही तिने मुख्य आरोपीच्या सांगण्यावरून उघडली असल्याची माहिती "ईडी'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. शनिवारी विमानतळावर आल्यानंतर "ईडी'ने कृतिकाला चौकशीनंतर अटक केली होती. ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Web Title: diamond, gold purchasing 220 transaction