
Navi Mumbai Airport
Sakal
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता. ८) उद्घाटन झाले. यावेळी संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. भगवे कमळ आणि झेंडे घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. प्रकल्पग्रस्तांच्या आनंदावर मात्र विरजण पडले. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होती, परंतु नावाची घोषणा न झाल्याने भूमिपुत्र नाराज झाले.