अनिल देशमुख यांनी धमकी दिली का?, राम कदम यांचा सवाल

अनिल देशमुख यांनी धमकी दिली का?, राम कदम यांचा सवाल

मुंबई: गृहरक्षक दलाचे कमांडर जनरल परम बीर सिंग यांच्या एका लेटरबॉम्बने राज्यात खळबळ उडाली आहे. परम बीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिण्यानं गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप झाले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढलं आणि आपली बाजू मांडली. यानंतर विरोधक आक्रमक झालेत. भाजपकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं काल मुंबईत आंदोलनंही केलं. 

आता भाजप नेते राम कदम यांनी नवनिर्वाचित मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली आहे. 100 कोटी रुपयांची वसूली समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची ईडीनं चौकशी करावी अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. 

या भेटीनंतर राम कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज मी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. आम्ही त्यांना पोलिसांचा चेहरा बदलला पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हॉटेल आणि बारमध्ये फक्त वसुलीसाठी नियम आणला की,  कोरोना आहे म्हणून नियम केला गेला आहे. याचा तपास करावा, असंही ते म्हणालेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काल सकाळी म्हणाले की, मुख्यमंत्री निर्णय घेतील पण संध्याकाळी सगळे लोक अनिल देशमुख यांच्यासोबत आहोत असे म्हणाले अनिल देशमुख यांनी काही धमकी दिली का?  असा सवालही राम कदम यांनी यावेळी उपस्थित केला.

आम्ही काही करत नाही आहेत. सचिन वाझेंच्या विरोधात सगळे पुरावे क्लिअर आहेत. तरीही सरकार का वाझेंना वाचवतात आम्हाला माहित नाही, असंही राम कदम म्हणाले आहेत.

Did home minister Anil Deshmukh threaten bjp leader Ram Kadam question

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com