ajit pawar death in plane crash
sakal
मुंबई - नेहमी शासकीय बैठकांचा धडाका, राजकीय कार्यक्रमांची रेलचेल आणि समर्थकांच्या गराड्यात राहणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. मात्र, काळाच्या पडद्याआड जाण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘दादा’ आपल्या कामातच व्यग्र होते. पहाटे लवकर कामाला सुरुवात करण्याचा आपला प्रघात त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवला होता.