अकरा लाखांचे डिझेल अरबी समुद्रातून जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - अरबी समुद्रातील डिझेल तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कारवाईत 11 लाखांचे डिझेल जप्त केले असून, याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. रामबाबू शत्रुघ्न ठाकूर, काशिनाथ शिबनाथ दास, महंमद अर्शद अब्दुल, मनोज त्ररुषी, अकबर पिंजारा, मोहम्मदअली पुंजलकटी, ललित कुमार अशी त्यांची नावे आहेत. सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. समुद्रातील तस्करीचे प्रकार रोखण्यासाठी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक हे समुद्रात गस्त करत असतात. 10 एप्रिलला पोलिस नियंत्रण कक्षात त्यांना फोन आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
Web Title: diesel seized in arabian sea crime