विविध मागण्यांसाठी कर्जतमध्ये बंद आणि मूकमोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

कोरेगाव भीमा दंगलीतील प्रमुख साक्षीदार पूजा सकटची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच सकट कुटुंबियांचे शासनाने पुनर्वसन करावे, आदी मागण्यांसाठी आज शहरात बंद पाळण्यात आला. 

कर्जत : कोरेगाव भीमा दंगलीतील प्रमुख साक्षीदार पूजा सकटची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच सकट कुटुंबियांचे शासनाने पुनर्वसन करावे, आदी मागण्यांसाठी आज शहरात बंद पाळण्यात आला. 

मातंग समाजाच्या विविध संघटना व रिपब्लिकन पक्षातर्फे तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश पवार, बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब भिसे, राजेंद्र पवार, रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हा सरटिणीस बाळासाहेब लोंढे, लहूजी लोंढे, तालुकाध्यक्ष चंदन भिसे, प्रभाकर पवार, विनोद पवार, तानाजी डाडर, डॉ. राजेंद्र पवार, सचिन घोडके, शोभा सकट, विजयालक्ष्मी पवार आदींसह बहुजन रयत परिषद, मातंग एकता आंदोलन, लहूजी शक्ती सेना, दलित महासंघ, रिपब्लिकन पक्ष आदी संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

तहसीलदार किरण सावंत व पोलिस उपनिरीक्षक शहादेव पालवे यांनी महिलांच्या हस्ते निवेदन स्वीकारले. त्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.

Web Title: different demands karjat Close and silent slogan