जमीन, ताऱ्यांमध्ये दडलेय काय?

जमीन, ताऱ्यांमध्ये दडलेय काय?

मुंबई - जमीन, सूर्यासह विविध ताऱ्यांमध्ये नेमके काय दडले आहे याचा शोध भारत घेणार आहे. त्यासाठी भारतातील विविध वैज्ञानिक संस्था एकत्रित येऊन स्वतंत्र डिटेक्‍टर बनवत आहे. तमिळनाडू येथे गेल्या वर्षीपासून या कामाला प्रारंभ झाला असून, येत्या काही वर्षांमध्ये यामध्ये प्रगती करण्यासाठी अभ्यासक प्रयत्नशील आहेत. 

भारतातील न्युट्रिनो वेधशाळा तयार करण्यासाठी देशातील टाटा मूलभूत संस्थेसह विविध आयआयटी या प्रकल्पामध्ये सहभागी आहेत. आपण आपल्या आसपासच्या लहरी पाहू शकत नाही. भारतात आजवर या लहरी पाहता आलेल्या नाहीत; त्या पाहण्यासाठी पहिला डिटेक्‍टर तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून सूर्यासह विविध ताऱ्यांमध्ये काय असेल, याचा अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी मेगा सायन्स प्रोजेक्‍ट राबवण्यात येत आहे. विज्ञान महासंमेलनात या प्रकल्पाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. 

उल्कापाताचे फोटो 
डिटेक्‍टरच्या माध्यमातून न्युट्रिनो प्लस व न्युट्रिनो मायन्स हे दोन्ही न्युट्रो पाहता येतील आणि त्या न्युट्रोच्या या साह्याने जमिनीमध्ये कोणती खनिजे आहेत किंवा खडक आहे याची माहिती मिळू शकेल. एखादा तारा फुटल्यानंतर त्याचे फोटोही या डिटेक्‍टरद्वारे घेता येणार आहेत. तसेच तारा फुटल्यानंतर तो पाहण्यासाठी विविध देशांना संदेशही देता येईल, असा दावा संशोधक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com