विनयभंग प्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मुलीच्या विनयभंग प्रकरणी पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना आज निलंबीत करण्यात आले

मुंबई: मुलीच्या विनयभंग प्रकरणी पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना आज निलंबीत करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचा आदेश गृह विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

#Breaking  - राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावनार

निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच श्री. मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन श्री. मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DIG Nishikant More suspended for breach of contract