डॉक्टरांच्या मदतीला डिजीटल स्टेथास्कोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

"आम्ही एक खास यंत्रणा तयार केली आहे. ती पारंपारीक स्टेथोस्कोपला जोडता येते. त्याच्या मदतीने हृदय आणि फुफ्फुसाचा आवाज वाढवता येईल. त्याचे रेकॉर्ड ठेवता येईल"

मुंबई : व्हाईट कोट आणि स्टेथास्कोप ही डॉक्टरांची ओळख, पण रुग्णाची तपासणीसाठी मोलाचा ठरलेल्या याच स्टेथास्कोपमुळे कोरोनाची लागण डॉक्टरांना होण्याचा धोका असतो. त्यावर आता आयआयटी मुंबईच्या छत्राखाली असलेल्या संस्थेने याची खास निर्मिती केली आहे. 

कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना विशेषतः वृ्धांना हृदयविकार तसेच फुफ्फुसाचा त्रास असू शकतो. या परिस्थितीत स्टेथास्कोपद्वारे तपासणी डॉक्टरांसाठीही धोकादायक ठरु शकते. आयुसिंकमुळे डॉक्टर आणि रुग्णातील अंतर वाढणार आहे तसेच आजूबाजूच्या कोणत्या आवाजाचा व्यत्यय डॉक्टरांच्या विश्लेषणात येणार नाही. या नोंदी शेअर करण्याची सुविधा आहे. प्रसंगी आरोग्य कर्मचारीही या नोंदी घेऊ शकतील आणि त्यामुळे डॉक्टरांवरील ताण कमी होऊ शकेल.

KEM, नायरमध्ये निवासी डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईत 79 नवे रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

"आम्ही एक खास यंत्रणा तयार केली आहे. ती पारंपारीक स्टेथोस्कोपला जोडता येते. त्याच्या मदतीने हृदय आणि फुफ्फुसाचा आवाज वाढवता येईल. त्याचे रेकॉर्ड ठेवता येईल," आयु डिव्हाईसेसचे आदर्श काचापिल्ली यांनी सांगितले. हे आयुसिंक आयआयटी मुंबईतील संशोधक काचापिल्ली आणि तपस पांडे यांनी डॉ. रुपेश घ्यायर यांच्या सहकार्याने तयार केले आहे. 

धारावी आता पूर्ण प्रतिबंधित विभाग : 

रहिवाशांकडून लॉककडाऊनचे उल्लंघन होत असल्याने धारावी आता पूर्ण प्रतिबंधित विभाग करण्यात आला आहे. धारावीतील रहिवाशांना बाहेर जाण्यास आणि बाहेरील व्यक्तीला प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. धारावीतील सर्व महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. प्रतिबंधित भागात फिरण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.

digital stethoscope to help doctors while checking patients 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digital stethoscope to help doctors while checking patients