esakal | KEM, नायरमध्ये निवासी डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईत 79 नवे रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

KEM, नायरमध्ये निवासी डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईत 79 नवे रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

केईएम रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्यावर तेथेच उपचार सुरू करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका निवासी डॉक्‍टरला लागण झाली. या डॉक्‍टरला कोविड-19 वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. 

KEM, नायरमध्ये निवासी डॉक्‍टर कोरोना पॉझिटिव्ह; मुंबईत 79 नवे रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : केईएम रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्यावर तेथेच उपचार सुरू करण्यात आले आहेत. नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने एका निवासी डॉक्‍टरला लागण झाली. या डॉक्‍टरला कोविड-19 वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. 

महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन कामकाज पाहत होते. त्यामुळे त्यांचा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांशी संपर्क येत होता. त्यातूनच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळते. काही दिवसांपूर्वी ताप आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून, तपासणी करण्यात येत आहे. 

मोठी बातमी येत्या तीन ते चार दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन हजारांवर जाऊ शकतो - प्रवीण परदेशी
 

महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या डॉक्‍टरांची थ्रोट स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक निवासी डॉक्‍टराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या चार निवासी डॉक्‍टरांची चाचणी घेण्यात आली. या चौघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

मुंबईत 79 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू 

मुंबईत गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 79 नवे रुग्ण सापडल्यामुळे बधितांची संख्या 775 वर गेली आहे. गुरुवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे बळींचा आकडा 54 झाला आहे. सहा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आतापर्यंत 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या 79 नव्या रुग्णांपैकी बहुतेक जण मध्यमवर्गीय व झोपडपट्टी परिसरातील असल्याचे समजते. मृतांपैकी अनेक जणांना दीर्घकालीन आजार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या पथकांनी आतापर्यंत 15 लाख व्यक्तींचे सर्वेक्षण केले. अति जोखमीच्या सहवासितांचा शोध घेऊन चाचणी करण्यात आली. पाच पथकांनी घरोघरी जाऊन कोरोना चाचणीसाठी 15 हजार नमुने गोळा केले. 

मोठी बातमी  - कोरोनाचा हाहाकार! मुंबईतील 381 ठिकाणे सील

प्रतिबंधित क्षेत्रात कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आठवडाभरात 40 विशेष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. या दवाखान्यांत 1588 जणांची तपासणी करण्यात आली आणि त्यांच्यापैकी 442 संशयित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले.

resident doctor detected positive in KEM and nair hospital 79 new corona positive

loading image
go to top