चित्रेंच्या समग्र कविता प्रकाशनाच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई  : एखादा कवी समजून घ्यायचा असेल, तर त्याच्या एक, दोन नाही तर समग्र कवितांचे वाचन, रसग्रहण केले पाहिजे, असे सांगणाऱ्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे तथा दि. पु. चित्रे यांच्या समग्र कवितांचे प्रकाशन पॉप्युलरच्या वतीने लवकरच करण्यात येणार आहे.

हजारहून अधिक पानांच्या या ग्रंथाला रणधीर शिंदे यांची प्रस्तावना आहे. 1960 नंतर दिपुंनी विपुल कविता लिहिल्या; परंतु त्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. चंद्रकांत पाटील आणि भालचंद्र नेमाडे यांनी त्या जमवल्या आणि 1978 मध्ये "कवितेनंतरच्या कविता' हा संग्रह प्रसिद्ध केला, तर अशोक शहाणे यांनी "दहा बाय दहा' हा काही स्वतंत्र आणि काही अनुवादित अशा कवितांचा संग्रह 1983 मध्ये प्रसिद्ध केला. तरीही चित्रे यांच्या अनेक कविता अप्रकाशित होत्या.

पॉप्युलर प्रकाशनाने दिपुंच्या कवितांचा त्रिखंडात्मक संग्रह हाती घेतला. त्यापैकी पहिला खंड 1992 मध्ये आणि दुसरा खंड 1995मध्ये "एकूण कविता-2' प्रकाशित झाला. कविता, कवितेनंतरच्या कविता आणि दहा बाय दहा या संग्रहातील कवितांचा तिसरा खंड 1997 मध्ये प्रकाशित करण्यात आला, तर चौथा खंड शनिवारी (ता. 10) दिपुंच्या सातव्या स्मृतिदिनी प्रकाशित करण्यात आला. आता त्यांच्या समग्र कवितांचा हजार पानांचा संग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे.

Web Title: dilip chitre's poems to be published