

Dipesh Mhatre on Raju Patil
Esakal
डोंबिवली : शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दीपेश म्हात्रे यांनी प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी मनसेचे आक्रमक नेते राजू पाटील यांना उघडपणे सोबत येण्याचे आमंत्रण दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. “आपण सोबत या, आपण एकत्र आलो तर शहराला चांगले सरकार देऊ,” असे म्हणत त्यांनी राजू पाटील यांना गळ घातली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऑफर दिली गेल्याने भाजप आता मनसेच्या मतपरिसरावर थेट शिरकाव करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.