Mahesh Kothare
esakal
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजपाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना “मी भाजपाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे” असे स्पष्ट केले. त्यांनी मुंबईत भाजपाचा महापौर होईल, असेही विधान केले. या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.