राजधानीच्या डब्यात घाणीचे साम्राज्य; रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्याचीच तक्रार

राजधानीच्या डब्यातच घाणीचे साम्राज्य; रेल्वे सल्लागार समितीच्या महिला सदस्याकडूनच तक्रार
राजधानीच्या डब्यातच घाणीचे साम्राज्य; रेल्वे सल्लागार समितीच्या महिला सदस्याकडूनच तक्रार

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने सोडलेल्या 15 विशेष ट्रेनपैकी भुवनेश्वर ते नवी दिल्ली धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये घाणीतच प्रवास केल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. आश्‍चर्य म्हणजे वडोदरा विभागाच्या रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्या रश्‍मी रंजन यांनाच घाणीचा सामना करावा लागला आहे. राजधानी एक्‍स्प्रेस दिल्लीत पोहचेपर्यंत तक्रारीची दखलच घेतली नसल्याचे ट्विटही रंजन यांनी केले असून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

वडोदरा येथील मूळ रहिवासी असलेल्या रश्‍मी रंजन लॉकडाऊनच्या काळात जमशेदपूर येथे अडकल्या होत्या. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने 15 विशेष ट्रेन सोडल्यानंतर रश्‍मी यांनी ट्रेन नंबर 02829 या भुवनेश्वर राजधानी एक्‍स्प्रेसने बी- 23 या डब्यामध्ये प्रवास केला; मात्र डब्यामध्ये शौचालयामधील लाईट बंद होते. शौचालय तुंबलेले होते. बेसीनमध्ये पाणी तुंबलेले होते. कोणत्याही प्रकारची स्वच्छता नव्हती. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात रेल्वेने ही स्वच्छता करणे अनिवार्य असतानाही डब्यांमध्ये घाण पसरली होती, अशी तक्रार रश्‍मी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली; मात्र जमशेदपूर ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेने या तक्रारीची दखलच घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर दिल्ली रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तर यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले असता स्टेशन मास्तरांनीसुद्धा उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे रश्‍मी यांनी सांगितले आहे. 

श्रमिक स्पेशल ट्रेनचे काय? 
दिल्लीसाठी धावणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनमध्येच घाणीचे साम्राज्य असेल, तर देशभरात ज्या श्रमिक स्पेशल ट्रेन सोडल्या जात आहेत त्यांची काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सल्लागार समितीची सदस्या असताना रेल्वे डब्यातील घाणीच्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे सर्वसामान्य मजुरांचे काय हाल असतील, हे लक्षात येते. या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर रेल्वेने कारवाई करावी. खरे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी निर्जंतुकीकरण करतात की नाही, याबाबतच आता शंका आहे. 
- रश्‍मी रंजन, सदस्या, वडोदरा विभागीय रेल्वे सल्लागार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com