जेव्हा उत्पादकच बनतात विक्रेते; व्हॉट्‌स ॲप, फेसबुकद्वारे शेतमाल घरोघरी!

औरंगाबाद : शहरात कांदा विक्रीसाठी आलेले सुधाकर पवार (टोपी घातलेले) आपल्या मित्रासह.
औरंगाबाद : शहरात कांदा विक्रीसाठी आलेले सुधाकर पवार (टोपी घातलेले) आपल्या मित्रासह.

मुंबई : पावसाळा तोंडावर आला आहे. कोरोनाचा कहर चालूच आहे. मोठे भाजीपाला, कांदा मार्केट बंद आहेत. त्यामुळे मालाला भाव नाही. अशा परिस्थितीत सुधारणा न झाल्यास शेतात केलेली मेहनत व खर्च वाया जाईल, अशी भिती आता शेतकऱ्यांना सतावत आहे; मात्र या संकटानेच संधीचे एक दार शेतकऱ्यांसाठी उघडले आहे. काही शेतकरी आपला माल स्वत: ग्राहकांपर्यंत घेऊन जात आहे. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांच्या हातात पुर्वीपेक्षा चांगले पैसे पडत आहेत आणि शहरात लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या नागरिकांनाही घरपोच सेवा मिळत आहे. राज्यातील शहरी भागांत असे अनेक शेतकरी आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. सुधाकर पवार त्यांपैकीच एक. 

औरंगाबादमध्ये वैजापुर तालुक्‍यातील कोल्ही गावात सुधाकर पवार आपल्या दोन भावंडांसह 10 एकरमध्ये शेती करतात. यंदा तिन्ही भावंडांनी मिळून विक्रमी 1000 क्विंटल कांद्याचे उत्पादन काढले; मात्र कोरोनामुळे कांदा मार्केट बंद, भाव नाही त्यामुळे खर्च केलेले पैसे तरी मिळतील का, हा प्रश्न. त्यावर उपाय शोधत सुधाकर पवार यांनी स्वत:च आपल्या कांद्यांचे व्यवस्थित पॅकेजिंग करुन तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. यासाठी व्हॉट्‌स ऍप, फेसबूकवरून मार्केटिंग केले. लोकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि बघता बघता काहि दिवसांमध्येच त्यांनी 200 क्विंटल कांदा विकलाही. त्यातून होणारा फायदा आणि लोकांचा प्रतिसाद पाहून यापुढे सर्व कांदा अशाच पद्धतीने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शहरी भागात सध्या अनेक टरबूज, आंबा उत्पादकही अशा पद्धतीने घरोघरी जात आपल्या मालाची विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहकांचीही सोय होत आहे. 

नफ्यावर आता आमचा हक्क 
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा व्यापाऱ्याला साधारणत: पाच ते सहा रुपये किलोने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. त्यातून दोन रुपये वाहतूक, हमाली असा इतर खर्चही वजा होतो. शेतकऱ्याच्या हातात जेमतेम 4 रुपये पडतात; तरीही ग्राहकांना तो कांदा 13 ते 15 रुपये किलोनेच बाजारात मिळतो. फायदा केवळ व्यापाऱ्यांचा होतो आणि शेतात घाम गाळूनही शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही; मात्र स्वत: मालाची विक्री केल्याने संपुर्ण नफा शेतकऱ्यांच्या हातात जातो. सुधाकर पवार 13 रुपये किलोने आपला कांदा विकत आहेत. यात वाहतुकीचा एक किलो कांद्यामागे जेमतेम 2 रुपये खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे किलोमागे 11 रुपये त्यांना निव्वळ फायदा होत आहे. हाच कांदा बाजार समितीत विकला असता तर 4 रुपये मिळाले असते, असे त्यांनी सांगितले. 

10 लाखांचे उत्पन्न अपेक्षित 
1000 क्विंटल कांद्याच्या विक्रीतून जवळपास 10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे सुधाकर पवार यांनी सांगितले. किमान 6 ते 7 लाख रुपये तरी नक्की मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, यापुढे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक म्हणून न राहता विक्रेता बनाव, या लॉकडाऊनमध्ये ते धाडस कराव, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले. 

कांद्यावरील निर्यात हटवा 
कोरोना संकट काळात शेतकऱ्यांना मदत म्हणून तसेच, स्थानिक उत्पादने जागतिक बाजारात पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच 10 हजार रुपयांची घोषणा केली. तसेच, पेरणी करतानाच शेतीमालाचा दर काय असेल हे ठरवणारी यंत्रणाही तयार करणार असल्याचे निर्मला सितारामण यांनी पॅकेज जाहीर करताना सांगितले; मात्र हे दिर्घकालीन उपाय आहेत; मात्र हे दिर्घकालीन उपाय आहेत. त्यांच्या अंमलबजावणीबाबत अद्याप माहिती नाही. सरकारला शेतकऱ्यांना खरच दिलासा द्यायचा असेल तर कांद्यावर घातलेली निर्यातबंदी सरकारने हटवावी. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होईल, असे सुधाकर पवार यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com