मोठा खांदा गावात गढूळ पाणी

मोठा खांदा गावात नळाद्वारे गढूळ पाणी.
मोठा खांदा गावात नळाद्वारे गढूळ पाणी.

पनवेल : पालिका हद्दीतील मोठा खांदा गावातील मागील दोन दिवसांपासून मातीमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. दूषित पाणी पुरवठा होत असल्याने परिसरात रोगराई पसरण्याची शक्‍यता निर्माण झाली असून नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नगरपालिका अस्तित्वात असल्यापासून पालिकेत समाविष्ट गावांपैकी असलेल्या मोठा खांदा गावात सिडको, तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून पालिकेतर्फे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो; मात्र सध्या गावातील नागरिकांची तहान गढूळ पाण्याने भागत आहे.

नगरपालिका असल्यापासून पालिकेत समाविष्ट गावांपैकी असलेल्या मोठा खांदा गावात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरात असलेल्या जलवाहिनींवर दोन ठिकाणी बूस्टर पंप बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी अशुद्ध व गढूळ पाणी नागरिकांना येत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. 
ग्रामस्थ करत असलेल्या आरोपांबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता गावात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून काही भागात जलवाहिनीतील पाणी चोरी करण्याकरिता जलवाहिन्या तोडण्यात येत आहेत. 
नादुरुस्त झालेल्या वाहिनीतून मातीमिश्रित पाणी जात असल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने बसवण्यात आलेले बूस्टर पंप नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहेत. गढूळ पाण्याची समस्या एकाच भागात असल्याने त्या भागातील जलवाहिनी नादुरुस्त झाल्याची शक्‍यता आहे. त्याबाबत माहिती घेऊन दुरुस्ती करण्यात येईल.
- उल्हास वाड, अधिकारी, पाणीपुरवठा.

 कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचे निवारण करण्याकरिता पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. गढूळ पाण्याबाबत काही भागात तक्रार असण्याची शक्‍यता असल्याने माहिती घेणार आहे.
- सारिका भगत, नगरसेविका, प्रभाग क्रमांक १४. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com