Mumbai News: इमारतीत प्रवेश नाकारला, दिव्यांगांमध्ये वातावरण तापलं, महापालिकेवर धडक; नेमकं प्रकरण काय?

Disabled persons Protest: प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांनी महापालिकेवर धडक दिली आहे. मात्र यावेळी मारतीत प्रवेश नाकारल्यामुळे दिव्यांगांमध्ये वातावरण तापलं आहे.
Disabled person Protest

Disabled person Protest

Esakal

Updated on

उल्हासनगर : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. ६) दिव्यांगबांधवांनी महापालिका भवनावर धडक देत आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांना महापालिकेच्या इमारतीत प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि प्रवेशद्वारावर घोषणाबाजीसह गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दिव्यांगांच्या काठी खरेदी प्रकरणातील कथित भ्रष्टाचार, मानधनाची मागणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com