पवार-शेलार भेटीमुळे चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी अचानक मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, मुंबई क्रिकेट संघटनेचे राजकरण या भेटीमागे असल्याचे सांगण्यात येते. 

शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. न्यायालयाने एमसीएवर प्रशासक नेमला असून 16 एप्रिलला घटनात्मक दुरुस्तीसाठी एमसीएची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात मोठे वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ही भेट झाली असल्याचे समजते. तासभर चाललेल्या बैठकीत क्रिकेट संघटनेबरोबरच राजकरणाची चर्चाही झाली असल्याचे समजते. मात्र, ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Discussion by Pawar-Shelar