बीएमसी आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी; आयुक्तांच्या माफीनंतर वादावर पडदा

तुषार सोनवणे
Wednesday, 14 October 2020

मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली आहे

मुंबई - मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाली आहे. सेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना चहल यांनी उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर या वादावर एक पाऊल मागे घेऊन आयुक्तांनीच माफी मागतली आहे.

EXCLUSIVE : सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांचे मुंबईत बेहाल; जेवणासह राहण्याची सोय नाही; एसटीच्या आवारात झोपूनच काढताहेत रात्र

5 ऑक्टोबर पासून मुंबई महानगर पालिकेच्या विविध समित्यांची निवडणूक सुरू आहे. आजही प्रभाग समित्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडेणेकर,  सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि सेनेचे नगरसेवक महापालिकेत उपस्थित होते. नगरसेवक पोहचूनही कोणतेही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, म्हणून महापौरांनी आयुक्तांना फोन केला. आयुक्तांनी 'तुम्हाला थोडं थांबता येत नाही का?' पॅनिक का होताय? असे उत्तर दिले. असं पेडणेकरांनी म्हटले आहे.

आयुक्तांच्या या विधानांवर शिवसेना नगसेवकांचा पारा चढला, जर पदभार सांभाळता येत नसेल तर राज्य शासनात परत जावे अशी टीका महापौरांनी आयुक्तांवर केली. यासोबत आपण अनेक वेळा फोन केला तरी, आयुक्त काहीही कारणं सांगून टाळाटाळ करतात. तुम्हाला संयम नाही का ?अशा भाषेत उद्धट उत्तरे देतात असा आरोप विशाखा राऊत यांनीही केला.

मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून अमृता फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

परंतु या वादाला आयुक्तांनी जास्त ताणले नाही. चहल यांनी स्वतःहून महापौर आणि विशाखा राऊत यांना फोन केला. मला लहान भाऊ समजून माफ करा अशी विनंती केली. चहल यांनी एक पाऊल मागे घेतल्यामुळे महापौर आणि राऊत यांनीही लहान भावानंही इथून पुढे मोठ्या बहिणींचं ऐकावं असे म्हणत या वादावर पडदा टाकला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between Mayor Pednekar and Commissioner Chahal, Commissioner apologized