डोंबिवली : डोंबिवली पश्चिम परिसरात वाहतूक पोलिस (Traffic Police) आणि रिक्षा चालक यांच्यातील वाद चिघळला असल्याचे पहायला मिळाले. वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे बेकायदा रिक्षा चालकांचे चांगलेच फावले आहे. वारंवार तक्रारी निवेदने देऊन सुद्धा बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत आज पश्चिमेतील रिक्षा चालकांनी स्टेशन परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे (Deepesh Mhatre) यांनी पाठिंबा दिला.