vasai virar municipal corporation
sakal
विरार - वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये नगरसेवक अपात्रतेची लढाई चांगलीच रंगली आहेत भाजपने बहुजनच्या निवडून आलेल्या १६ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
त्याच वेळी बहुजन विकास आघाडी कडून भाजपच्या २३ निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली असल्याने आता वसई विरार मधील हि लढाई न्यायालयात गेली आहे. त्यामुळे दोन्ही अर्जावर न्यायालयात ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. न्यायालय यावर काय निर्णय देते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.